महिला प्रीमियर लीगमध्ये सानिया मिर्झा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मार्गदर्शक
भारताची प्रसिद्ध टेनिस स्टार खेळाडू सानिया मिर्झाची महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सानिया मिर्झाने मेंटॉर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. महिला प्रीमियर लीगमुळे भारतीय महिला क्रिकेट अधिक मजबूत होईल, असे सानिया म्हणाली. सानिया मिर्झा पुढे म्हणाली की, महिला प्रीमियर लीग महिलांचा खेळण्याचा उत्साह वाढवेल आणि त्यांच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग तयार करेल.
Post a Comment